१९९० फिफा विश्वचषक

१९९० फिफा विश्वचषक
Italia '90
स्पर्धेसाठी असलेला चेंडू
स्पर्धा माहिती
यजमान देशइटली ध्वज इटली
तारखा८ जून८ जुलै
संघ संख्या२४
स्थळ१२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतापश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (३ वेळा)
उपविजेताआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थानइटलीचा ध्वज इटली
चौथे स्थानइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
इतर माहिती
एकूण सामने५२
एकूण गोल११५ (२.२१ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या२५,१६,३४८ (४८,३९१ प्रति सामना)

१९९० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौदावी आवृत्ती इटली देशामध्ये ८ जून ते ८ जुलै १९९० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने आर्जेन्टिनाला १–० असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात निकृष्ट दर्जाची समजली जाते. बऱ्याचशा संघांनी बचावात्मक डावपेच वापरण्यावर भर दिला ज्यामुळे प्रति सामना गोलांची संख्या कमी झाली व सामने निरस झाले.


Other Languages
العربية: كأس العالم 1990
беларуская (тарашкевіца)‎: Чэмпіянат сьвету па футболе 1990 году
Bahasa Indonesia: Piala Dunia FIFA 1990
Bahasa Melayu: Piala Dunia FIFA 1990
norsk nynorsk: VM i fotball 1990
Simple English: 1990 FIFA World Cup