स्पॅनिश गृहयुद्ध

स्पॅनिश गृहयुद्ध
दिनांक१७ जुलै, १९३६१ एप्रिल, १९३९
स्थानस्पेन, स्पॅनिश मोरोक्को, स्पॅनिश सहारा, कॅनरी द्वीपसमूह, बालेआरिक द्वीपसमूह, भूमध्य समुद्र, उत्तरी समुद्र
परिणतीराष्ट्रवाद्यांचा विजय
युद्धमान पक्ष
रिपब्लिकन
सहकारी:
स्पेन राष्ट्रवादी गट
सहकारी:
सैन्यबळ
पायदळ: ४.५ लाख
विमाने: ३५०
पायदळ: ६ लाख
विमाने: ६००

स्पॅनिश गृहयुद्ध (स्पॅनिश: Guerra Civil Española) हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते. इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. ह्या अर्धयशस्वी बंडानंतर स्पेन देश राजकीय व भौगोलिक दृष्ट्या विभागला गेला. त्यानंतर फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केले. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरनेइटलीच्या बेनितो मुसोलिनीने पाठिंब दिला तर मेक्सिकोसोव्हियेत संघाने प्रस्थापित सरकारच्या बाजूने लढण्यासाठी सैन्य पाठवले.

जगातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या स्पॅनिश गृहयुद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड जिवितहानी झाली. ह्या युद्धात विजय मिळवून लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोने स्पेनमध्ये एकाधिकारशाही स्थापित केली.


Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Грамадзянская вайна ў Гішпаніі
brezhoneg: Brezel Spagn
français: Guerre d'Espagne
Fiji Hindi: Spanish Civil War
Bahasa Indonesia: Perang Saudara Spanyol
한국어: 스페인 내전
Lëtzebuergesch: Spuenesche Biergerkrich
Plattdüütsch: Spaansche Börgerkrieg
नेपाल भाषा: स्पेनी गृहयुद्ध
srpskohrvatski / српскохрватски: Španski građanski rat
Simple English: Spanish Civil War
Bân-lâm-gú: Se-pan-gâ Lōe-chiàn