स्टार ट्रेक:व्हॉयेजर

स्टार ट्रेक:व्हॉयेजर
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे शीर्षक चित्र
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे शीर्षक चित्र
उपशीर्षकस्टार ट्रेक:व्हॉयेजर
प्रकारविज्ञान कथा
निर्मातारिक बर्मन
मायकल पिल्लर
जेरी टेलर
निर्मिती संस्थापॅरॅमाऊंट टेलीवीझन
कलाकारकेट मुलग्रु
रॉबर्ट बेल्ट्रॅन
रोक्झॅन डॉसन
रॉबर्ट डंकन मॅकनिल
जेनिफर लिन
ईथान फिलीपस
रॉबर्ट पिकार्डो
टिम रस
जेरी रायन
गॅरेट वाँग
शीर्षकगीतजेरी गोल्डस्मिथ
अंतिम संगीतजेरी गोल्डस्मिथ
देशअमेरिका
भाषाइंग्लिश
वर्ष संख्या
एपिसोड संख्या१७२ (मालिकेतील भागांची यादी)
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माताब्रॅनंन ब्रागा
जेरी टेलर
केन्नेथ बिल्लर
चालण्याचा वेळ४५ मिनिटे प्रत्येक भाग.
प्रसारण माहिती
वाहिनीयु.पी.यन. वाहिनी
चित्र प्रकारएन.टि.एस.सी (एस.डी.टी.वी.)
ध्वनी प्रकारसराऊंड साऊंड ध्वनी
पहिला भागकेयरटेकर
प्रथम प्रसारणजानेवरी १६, १९९५ – मे २३, २००१
अधिक माहिती
आधीस्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
नंतरस्टार ट्रेक:एंटरप्राइझ

स्टार ट्रेक:व्हॉयेजर (English:Star Trek: Voyager) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेक या दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.

स्टार ट्रेक: व्हॉयेजर ही मालिका रिक बर्मन, मायकेल पिल्लर आणि जेरी टेलर यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील ही चौथी मालिका आहे. या मालिकेचे सात पर्व आहेत, जे १९९५ ते २००१ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील सर्व मालिकांमधून हिच एकटी मालिका अशी आहे ज्या मध्ये कॅप्टन चे पात्र एका स्त्रीने नीभवलेले आहे. कॅप्टन कॅथरीन जेनवे ही स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या मुख्य पात्र आहे. अजून पुढे ही मालिका खूप लोकप्रिय झाली कारण प्रत्येक भागातील कहाणी एकदम निमग्न होती व भागातील कहाण्यांमधून वारंवार बॉर्ग प्रजातीचा समावेश होत असे. ही मालीका लोकप्रिय होण्याचे अजून कारण असे कि घरंदाज खलाशी, विज्ञान कथेवर आधारीत कहाणी, मग्न करणाऱ्या घटनाक्रम व हलके विनोद. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील घटनाक्रम स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या घटनाक्रमानंतर चालते व त्याच्या सुरवातीला पाच पर्व हे स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन बरोबर प्रक्षेपीत करण्यात आले.

स्टार ट्रेक: व्हॉयेजर कथानक २४व्या शतकात वर्तविलेले आहे, ज्या मध्ये स्टारफ्लीट या पृथ्वीवरील संस्थेचे अंतराळ जहाज यु.एस.एस. व्हॉयेजर हे पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब जाउन फसते. यु.एस.एस. व्हॉयेजर हे बॅड-लॅडंस नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या अंतराळ जहाजाचा शोध घेत असतात. त्या वेळेस एक केयरटेकर नावाच्या प्रजातीच्या प्राणी त्यांना पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब डेल्टा क्वाड्रंट मध्ये ओढतो जेथे त्याचा निवास असतो. पुढे घटनाक्रम असे वळतात कि यु.एस.एस. व्हॉयेजर आणि माक्वी हे दोघे मिळून केयरटेकरच्या संरक्षणासाठी त्याच्या दुश्मना सोबत लढा देतात. या लढ्यात दुश्मनांचा पराभव होतो, पण माक्वींचे जहाज नष्ट होते व त्यांना पृथ्वी परत जाण्यासाठी कोणतेही वाहन उरत नाही. पृथ्वीही त्यांच्या सध्याच्या जागेपासून एकूण ७०,००० प्रकाश वर्षे लांब असते, व एवढे अंतर कापण्यासाठी त्यांना तब्बल ७५ वर्षे सतत प्रवास करावा लगेल[१]. या सर्व कारणांवरून दोघा जहाजाचे खलाशी एकत्र येऊन, एका जहाजात, एकजुटीने पृथ्वी कडे प्रवास करतात.

Other Languages