सिटी ऑफ लंडन

सिटी ऑफ लंडन
City of London
युनायटेड किंग्डममधील शहर

Aerial view of the City of London.jpg

Flag of the City of London.svg
ध्वज
Coat of Arms of The City of London.svg
चिन्ह
LondonCity.svg
ग्रेटर लंडनमधील स्थान

गुणक: 51°31′N 0°5′W / 51°31′N 0°5′W / 51.51667; -0.08333

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
क्षेत्रफळ २.९० चौ. किमी (१.१२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,९००
http://www.cityoflondon.gov.uk


सिटी ऑफ लंडन हा इंग्लंडातील ग्रेटर लंडन शहराचा भाग आहे. मध्ययुगीन काळातील लंडन म्हणजेच आजचे सिटी ऑफ लंडन होय. आजचे ग्रेटर लंडन हे सिटी ऑफ लंडन व ३२ इतर लंडन बरो मिळून बनले आहे.

सिटी ऑफ लंडन हा आजच्या लंडन शहराचा ऐतिहासिक गाभा आहे. या भागाभोवती आज दिसत असलेले उर्वरीत ग्रेटर लंडन उदयास आले. या शहराच्या चतु:सीमा मध्ययुगीन काळापासून फारशा बदललेल्या नाहीत. मध्य लंडनाचा लक्षणीय भाग असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ जेमतेम १ वर्ग मैलाइतके आहे. पारंपरिक संकेतानुसार लंडनाच्या नकाशांत या भूभागाचा उल्लेख "सिटी" असा केला जातो. तसेच, या भागाचा संदर्भ देताना 'सिटी' अथवा 'स्क्वेअर माइल' या संज्ञा वापरल्या जातात.

या शहराचे स्थानिक प्रशासन सिटी ऑफ लंडन महानगरपालिकेच्या हाती असून ब्रिटनातील इतर स्थानिक प्रशासकीय संस्थांपेक्षा वेगळे अधिकार या महानगरपालिकेला आहेत. तसेच, सिटी ऑफ लंडनाच्या हद्दीबाहेरच्या काही बाबींची जबाबदारी आणि काही अधिकार हे या महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. सिटी ऑफ लंडन महानगरपालिकेचा मुख्य लॉर्ड मेयर असून हे पद मेयर ऑफ लंडन या पदाहून निराळे व स्वतंत्र आहे.

सध्याचे सिटी ऑफ लंडन हे एक मोठे व्यापार व आर्थिक उलाढालींचे केंद्र आहे.

या शहरातील रहिवाशांची संख्या १००००च्या आसपास असून दररोज येथे साधारणत: ३३०,०००लोक उद्योगधंद्यानिमित्त येतात. सिटी ऑफ लंडनाचा पश्चिमेकडील प्रमुख भाग म्हणजे टेम्पल लेन व चॅन्सरी लेन येथे असलेल्या वकिलीव्यवसायाशी निगडित 'इन्स ऑफ कोर्ट' होत. यांपैकी इनर टेंपल व मिडल टेंपल या सिटी ऑफ लंडनाच्या कक्षेत येतात.

Other Languages
Afrikaans: City of London
Ænglisc: Lundenceaster
تۆرکجه: سیتی لندن
беларуская: Сіці (Лондан)
български: Сити (Лондон)
català: La City
čeština: City (Londýn)
Esperanto: City (Londono)
español: City de Londres
فارسی: سیتی لندن
français: Cité de Londres
Bahasa Indonesia: City of London
íslenska: Lundúnaborg
қазақша: Сити
lietuvių: Londono Sitis
latviešu: Londonas Sitija
Bahasa Melayu: Bandar raya London
Nederlands: City of London
norsk nynorsk: City of London
پنجابی: لندن شہر
português: Cidade de Londres
română: City of London
русский: Сити (Лондон)
srpskohrvatski / српскохрватски: City of London
Simple English: City of London
slovenčina: City of London
српски / srpski: Сити (Лондон)
Türkçe: Londra Şehri
українська: Лондонське Сіті
اردو: لندن شہر
Tiếng Việt: Thành phố Luân Đôn
West-Vlams: City of London
吴语: 伦敦城
中文: 倫敦市
Bân-lâm-gú: Lûn-tun Chhī
粵語: 倫敦市