शाहरुख खान

शाहरुख खान
जन्म२ नोव्हेंबर, १९६५ (1965-11-02) (वय: ५३)
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता, निर्माता
कारकीर्दीचा काळइ.स. १९८८ -
भाषाहिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
पत्नीगौरी खान
अपत्येअबराम, सुहाना, आर्यन
Twitter icon.pngiamsrk
पत्नी गौरी खान सह शाहरुख

शाहरुख खान (Shah Rukh Khan; जन्म: २ नोव्हेंबर, इ.स. १९६५, लोकप्रिय संक्षिप्त नाव: एस.आर.के.) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो [ संदर्भ हवा ]. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो [ संदर्भ हवा ].

१९८०च्या दशकामध्ये फौजी, सर्कस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये शाहरूखने भूमिका केल्या. २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून त्याने १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची जोडी लोकप्रिय आहे [ संदर्भ हवा ].

शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे. २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. २००७ साली कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा तो सादरकर्ता होता. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले, तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. खूप गरीब परिस्थितीमधून यश मिळवलेला हा लोकांचा खूप प्रिय कलाकार आहे . त्याचे चाहते फक्त भारतात नसून अख्या जगभर आहेत. 

चित्रपटयादी

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
इ.स.१९९२ दीवाना राजा साहाय्य फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
चमत्कार सुंदर श्रीवास्तव
दिल आशना है करण सिंह
राजू बन गया जंटलमन राज  माथूर
इ.स.१९९३ माया मेमसाब ललित कुमार
किंग अंकल अनिल  भन्साळी
बाजीगर विकी मल्होत्रा / अजय   शर्मा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
डर राहुल  मेहरा फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार
इ.स.१९९४ कभी हाँ कभी ना सुनील फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
अंजाम विजय अग्निहोत्री
इ.स.१९९५ करण अर्जुन करण अर्जुन
जमाना दीवाना राहुल  सिंग
गुड्डू गुड्डू बहादूर
ओ डार्लिंग, ये है इंडिया! ओ डार्लिंग, ये है इंडिया!
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे राज  मल्होत्रा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
राम जाने राम जाने
त्रिमूर्ती रोमी  सिंग 
इ.स.१९९६ इंग्लिश बाबू देसी मेम गोपाळ मयूर / हरी मयूर
चाहत रूप  राठोर 
इ.स.१९९७ कोयला शंकर
येस बॉस राहुल  जोशी
परदेस अर्जुन सागर
दिल तो पागल है राहुल फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
डुप्लिकेट बबलू  चौधरी
इ.स.१९९८ दिल से.. अमरकांत  वर्मा
कुछ कुछ होता है राहुल  खन्ना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
इ.स.१९९९ बादशाह राज  / बादशाह
इ.स.२००० फिर भी दिल है हिंदुस्तानी अजय  बक्षी
हे राम अमजद  खान
जोश मॅक्स "मॅक्सी" डायस
मोहब्बतें राज आर्यन मल्होत्रा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
इ.स.२००१ वन टू का फोर अरुण वर्मा
अशोका अशोका
कभी खुशी कभी गम राहुल रायचंद
हम तुम्हारे हैं सनम गोपाळ
इ.स.२००२ देवदास देवदास फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
इ.स.२००३ चलते चलते राज माथुरे
कल हो ना हो अमान  माथूर
इ.स.२००४ ये लम्हे जुदाई के दुष्यंत
मैं हूं ना राम प्रसाद शर्मा
वीर-झारा वीर प्रताप सिंग
स्वदेस मोहन भार्गव फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
इ.स.२००५ पहेली
इ.स.२००६ कभी अलविदा ना कहना
डॉन डॉन
इ.स.२००७ चक दे! इंडिया फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
ओम शांती ओम ओम शांती ओम
इ.स.२००८ रब ने बना दी जोडी रब ने बना दी जोडी
इ.स.२०१० माय नेम इज खान खान फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
इ.स.२०११ रा.वन
डॉन २
इ.स.२०१२ जब तक है जान
इ.स.२०१३ चेन्नई एक्सप्रेस
इ.स.२०१४ हॅपी न्यू इयर
इ.स.२०१५ दिलवाले फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन
इ.स. २०१६ फॅन '
डियर जिंदगी
इ.स. २०१७ रईस
Other Languages
Afrikaans: Shah Rukh Khan
አማርኛ: ሻህሩኽ ኻን
aragonés: Shah Rukh Khan
العربية: شاه روخ خان
azərbaycanca: Şahrux Xan
беларуская: Шах Рух Хан
български: Шах Рук Хан
भोजपुरी: शाहरुख खान
brezhoneg: Shahrukh Khan
català: Shahrukh Khan
нохчийн: ШахӀ Рух Хан
کوردی: شاروخ خان
čeština: Shahrukh Khan
डोटेली: शाहरूख खान
ދިވެހިބަސް: ޝާހުރުކް ޚާން
Ελληνικά: Σαχ Ρουκ Κχαν
Esperanto: Shahrukh Khan
español: Shahrukh Khan
euskara: Shahrukh Khan
فارسی: شاهرخ خان
français: Shahrukh Khan
गोंयची कोंकणी / Gõychi Konknni: Shah Rukh Khan
ગુજરાતી: શાહરૂખ ખાન
Fiji Hindi: Shah Rukh Khan
հայերեն: Շահրուխ Խան
Bahasa Indonesia: Shah Rukh Khan
italiano: Shah Rukh Khan
Basa Jawa: Shahrukh Khan
ქართული: შაჰ რუხ ხანი
қазақша: Шахрух Хан
한국어: 샤루크 칸
कॉशुर / کٲشُر: شاہ رخ خان
Кыргызча: Шахрух Кхан
Lëtzebuergesch: Shahrukh Khan
لۊری شومالی: شا رخ خان
lietuvių: Shah Rukh Khan
latviešu: Šāhruhs Hāns
मैथिली: शाहरूख खान
മലയാളം: ഷാരൂഖ് ഖാൻ
монгол: Шарук Кан
Bahasa Melayu: Shah Rukh Khan
မြန်မာဘာသာ: ရှရွတ်ခန်း
नेपाली: शाहरूख खान
Nederlands: Shahrukh Khan
پنجابی: شاہ رخ خان
português: Shahrukh Khan
Runa Simi: Shahrukh Khan
română: Shah Rukh Khan
русский: Хан, Шахрух
संस्कृतम्: शाहरूख खान
srpskohrvatski / српскохрватски: Shahrukh Khan
Simple English: Shahrukh Khan
Soomaaliga: Shahrukh Khan
svenska: Shahrukh Khan
тоҷикӣ: Шоҳрух Хон
Türkçe: Shahrukh Khan
українська: Шахрух Хан
oʻzbekcha/ўзбекча: Shahrukh Khan
vepsän kel’: Han Šahruh
Tiếng Việt: Shahrukh Khan
მარგალური: შაჰ რუხ ხანი
粵語: 沙魯克汗