विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास

People icon.svg

अपूर्ण लेख विकास प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .

आपणास इच्छा असलेल्या लेखाबद्दल लिहिणे चालू करताना ,' ह्या विषयी सर्वांना माहितच आहे' , किंवा 'इतर कुणीतरी लिहितच आहे तर मी कशाला' हे दोन्ही विचार अगोदर मनातून झटकून टाका.


विस्तार कसा करावा?

  1. लेख वाढवण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे संपूर्णतः नवे लेखन करणे आणि दुसरे म्हणजे इतर भाषी विकिपीडियातील मजकुराचे भाषांतर करणे. भाषांतरा करिता विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पहावा. हे लेख पान मुख्यत्वे नवे लेखन कसे वाढवत जावे याचे काही मार्ग सुचवते
  2. आपण मराठी विकिपीडियात प्रथमच संपादन करत असाल तर विकिपीडिया:परिचय, संपादन कसे करावे या बाबत माहिती सहाय्य:संपादन येथे उपलब्ध आहे.विकिपीडिया:लेखनभाषा संकेत , विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ,विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी येथेसुद्धा वेगवेगळी माहिती घेता येईल.सहाय्य:संपादन कालावधी येथे लागणार्‍या कालावधीचा अंदाजा येऊ शकेल.आपल्याला इतर सदस्यांसोबत सहयोगी लेखन करावयाचे असल्यास विकिपीडिया:प्रकल्प येथे भेट द्या.
  3. ज्या लेख विषयाबद्दल लेखन करावयाचे आहे , तो विषय आधी स्वतः समजून घ्या.पुस्तके, कोश अशीकाही स्रोत/साधने उपलब्ध असल्यास त्यांचे वाचन करून संदर्भ देण्या जोग्या टिपा काढून ठेवाव्यात स्वतःचे काही पूर्वग्रह असतील तर ते समजून घ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहा शिवाय इतर दृष्टीकोनांचेसुद्धा वाचन केलेले चांगले.
  4. लेखन स्वतःच्या शब्दात करा, केवळ विशेषणे आणि असे करा अशा पद्धतीचे लेखन टाळले तरी विकिपीडिया लेखनशैली बर्‍यापैकी अवगत व्हावयास लागते.
  5. इंग्रजी,हिंदी, संस्कृत सहभाषी विकिपीडीयात लेख उपलब्ध असेल तर प्रथमतः आंतरविकिदुवे उपलब्ध आहेत का याची खात्री करावी.
  6. लेखपान विस्तार विनंती शिवाय पूर्ण रिकामे असेल तर पानावर ==स्रोत== असे लिहून नवा विभाग जोडा व ऊपयूक्त संदर्भ पुस्तके/माहिती व संदर्भ दुव्यांची नोंद करा जेणे करून तुमचे आणि भावी संपादकांचे काम सुकर होईल'संदर्भ दुवे देताना उद्देश स्वतःच्या वेबसाईटच्या किंवा स्वतःचा व्यक्तिगत मताच्या प्रचारार्थ दुवा देण्याचा उद्देश नसावा याची दक्षता घ्या.' (अधीक माहिती हितसंघर्ष येथे पहा)
    1. प्रताधिकार कायद्याचे कुठेही उल्लंघन टाळा.अधिक माहितीकरिता पहा विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
    2. स्रोत नमुद करणे म्हणजे संदर्भ देणे नव्हे .संदर्भ संबधीत शब्दा पुढे अथवा ओळीनंतर जोडावेत.सहाय्य:नेहमीचे प्रश्न#संदर्भ कसे द्यावेत
    3. आंतरजालावर खासकरून गूगलवर शोध घ्यावयाचा असेल तर शिर्षक नावावर (किंवा कोणत्याही शब्दावर) डबल क्लिक करा आणि नंतर राईट क्लिक करा तेथून तूम्हाला तो शब्द तुमच्या शोध यंत्रात अधीक सहजतेने वेळ वाचवून शोधता येईल.
    4. गूगल इत्यादी आंतरजाल शोध यंत्रात बर्‍याचदा हिंदी भाषिक शोध समोर येतात त्या एवजी मराठी भाषिक शोध मिळवण्या साठी आपण शोधत असलेल्या शब्दासोबत "आणि, म्हणजे, आहे" इत्यादी प्रकारचे मराठी शब्द किंवा क्रियापद योजावे. त्यामुळे मराठी शोध घेणे सोपे होते.
  7. लेखाच्या पहिल्या परिच्छेदात शीर्षक लेख "म्हणजे काय? "/ कोण ?/ अथवा स्थलनाम असेल तर कुठे हे नमुद केले आहे का ते तपासा (हा/ही/हे ...... आहे/होते) . नसेल तर नमुद करा. शीर्षक लेख "म्हणजे काय? " या प्रश्न पडत असेल तर / व्याख्या देण्या जोगा असेल तर उपलब्ध व्याख्या तपासा/ व्यख्या उपलब्ध करा. गूगलवर मराठीत शोधताना 'म्हणजे' शब्दासहीत शोध घेतला असता इंग्रजीत शोधताना शोध शब्दा पुर्वी Define: असे म्हटले तर व्याख्या सहज उपलब्ध होण्याची शक्यता असते.
  8. आवश्यकते नुसार त्या शीर्षकास इतर संबधीत भाषेत कसे लिहिले जाते हे नमुद करावे.
  9. पहिल्या परिच्छेदात लेख विषयाचे सिंहावलोकन होईल असा अत्यंत संक्षीप्त परिचय द्यावा.
  10. माहिती चौकट साचे
  11. एखादे स्थल- विशेषनाम कसे उदयास आले ते आवश्यकते नुसार शब्द व्यूत्पत्ती नमुद करावयास हरकत नाही उदाहरणार्थ पुणे हे नाव कसे उदयास आले.(पण विकिपीडिया हा सब्दार्थ कोश नाही हे लक्षात ठेवावे)
  12. त्यांनतर सहसा लेख विषयाचे वेगळ्या विभागातून इतिहास अथवा विहंगावलोकन होईल हे पहावे.
Other Languages