लैंगिक शिक्षण
English: Sex education

लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते.लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनाना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात. लैंगिकतेशी संबंधित विचार 'विवेकपूर्ण' बनवणे अभिप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय संस्था हा याप्रकारचे शिक्षण देण्याचा एक सयुक्तिक मार्ग समजला जातो.

भारतीय समाजाबद्दल विचार केला असता, कामजीवन आणि लैंगिक शिक्षणाबद्दल बरेच समज आणि गैरसमज समाजात प्रचलित असल्याचे दिसून येते. काही काळापूर्वी पाश्चात्त्य समाजातही औपचारिक लैंगिक शिक्षण देण्याची परंपरा नव्हती. आधुनिक वैद्यक आणि प्रजननशास्त्रातील अद्‌भुत प्रगतीमुळे मानवी समाजातील समज आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक वस्तुस्थिती यात लोकांना स्वाभाविक अतंर जाणवू लागले. समाजातील व्यक्तिगणिक तसेच प्रदेश, जाती, धर्म, समूह, राजकीय विचारप्रणाली, संस्कृती इत्यादींमध्ये कामजीवनाविषयी समजभिन्नता आहे आहे हे निदर्शनास येते.

गर्भवती स्त्रीने/स्त्रियांनी पपई खाऊ नये त्याने गर्भपात होतो असा समज भारत सोडून इतरत्र कोठेही असल्याचे माहीत नाही; आणि आधुनिक वैद्यकशास्त्र अजूनपर्यंत तरी या काळात 'पपई खाऊ नये' असे सिद्ध करू शकलेले नाही. हवामानप्रकृतीनुसार पाळावयाचे पथ्य आणि कुपथ्य या विषयात भारतात जेवढे संकेत आहेत तेवढे आधुनिक वैद्यकशास्त्रात नाहीत.

जीवनसत्वाची अधिक आवश्यकता गरोदरपणात असते. ई जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या फक्त पपई या फळात विपुल प्रमाणात असते पण भारतीय समाजातील समजामुळे बहुसंख्य आधुनिक भारतीय वैद्यकांना गर्भवती स्त्रियांची ई जीवनसत्त्वाची गरज इतर कृत्रिम औषधी रसायनांनी भागवण्याचा सल्ला द्यावा लागतो.

VictorianPostcard.jpg

शिवीगाळ, बहुतांशी चुकीची असलेली सवंग माहिती पुरवणारे सवंगडी, अश्लील व वैद्यकीयदृष्ट्या अनधिकृत वाङमय, शौचालये आणि मुताऱ्या हेच दुर्दैवाने भारतातील बहुसंख्य लोकांचे लैंगिक शिक्षणाचे माध्यम रहात आले आहे.

अनुक्रमणिका

Other Languages
العربية: تربية جنسية
беларуская (тарашкевіца)‎: Палавая асьвета
English: Sex education
Esperanto: Seksa edukado
हिन्दी: यौन शिक्षा
Bahasa Indonesia: Pendidikan seksual
日本語: 性教育
한국어: 성교육
Lëtzebuergesch: Sexualpedagogie
Bahasa Melayu: Pendidikan seks
नेपाली: यौन शिक्षा
português: Educação sexual
srpskohrvatski / српскохрватски: Seksualno obrazovanje
Simple English: Sex education
slovenčina: Sexuálna výchova
українська: Статеве виховання
Tiếng Việt: Giáo dục giới tính
中文: 性教育