लुफ्तान्सा

लुफ्तान्सा
Lufthansa wordmark.svg
आय.ए.टी.ए.
LH
आय.सी.ए.ओ.
DLH
कॉलसाईन
लुफ्तान्सा
स्थापना१९२६, १९५४मध्ये पुनर्स्थापना
हबफ्रांकफुर्ट विमानतळ
म्युनिक विमानतळ
मुख्य शहरेबर्लिन, हांबुर्ग, मिलान, श्टुटगार्ट
फ्रिक्वेंट फ्लायरमाइल्स अँड मोअर
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्या
विमान संख्या६६७
गंतव्यस्थाने२१५
ब्रीदवाक्यNonstop you
मुख्यालयक्योल्न
प्रमुख व्यक्तीकार्श्टेन स्फोर
संकेतस्थळhttp://www.lufthansa.com

दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसर्‍या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[१] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[२]

लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[१][३][४][५] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[६] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).

फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे लुफ्तांसाचे एरबस ए३४०-६००

लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एअरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.

विमानांचा ताफा

एरबस ३२०-२००
ए३१९-१००चा छोटा उपप्रकार
ए३२१-१००चा अधिक मोठा उपप्रकार. या चित्रातील विमान लुफ्तांसाच्या १९५०च्या दशकातील रंगसंगतीत रंगवलेले आहे.

मार्च २०१५च्या सुमारास लुफ्तांसाकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८][९][१०][११]

मुख्य ताफा (मेनलाइन)
प्रकार सेवेत मागणी ऑप्शन प्रवासी नोंदी
F B E Y एकूण
एरबस ए३१९-१०० ३० १३८ १३८
एरबस ए३२०-२०० ५५ ३० 75[A] १६८ १६८
एरबस ए३२०निओ ६० अज्ञात
एरबस ए३२१-१०० २० २०० २००
एरबस ए३२१-२००
एरबस ए३२१निओ ४० अज्ञात
एरबस ए३३०-३०० १९
४८ १६१ २१७
१६५ २२१
एरबस ए३४०-३०० १७ ४८ १६५ २२१ यातील ८ विमाने लुफ्तांसा सिटीलाइनला देउन परत भाड्यावर घेण्यात येतील. ही विमाने सहलीच्या मार्गांवर जास्त प्रवासी बसतील अशा संरचनेत वापरण्यात येतील.[१२]
३६ १९७ २४१
४४ २२२ २६६
एरबस ए३४०-६०० २४
६० २३८ ३०६
५६ २२९ २९३
एरबस ए३५०-९०० २५[१३] १५[१३] अज्ञात २०१६-२०२३ दरम्यान सेवादाखल[१४]
एरबस ए३८०-८०० १३ ९८ ४२० ५२६ २०१५मध्ये अजून एक सेवेत दाखल
९२ ५२ ३३६ ४८८
बोईंग ७३७-३०० १४० १४० २०१५नंतर सेवानिवृत्त[१५]
बोईंग ७३७-५०० १३ १२० १२० २०१५नंतर सेवानिवृत्त[१५]
बोईंग ७४७-४०० १६
८० २४२ ३३०
६६ २७८ ३५२
६७ ३२२ ३८९
बोईंग ७४७-८आय १८
९२ २६२ ३६२ २०१५मध्ये अजून एक सेवादाखल[१६]
D-ABYI या विमानाला फॅनहंसा सीगरफ्लीगर रंगसंगती दिलेली आहे
D-ABYP हे १,५००वे ७४७ विमान आहे
D-ABYT या विमानाला १९७०मधील रंगसंगती दिलेली आहे.
८० २९८ ३८६
३२ २४४ ३६४
बोईंग ७७७-९एक्स ३४[१७] TBA २०२०-२०२५ दरम्यान सेवादाखल[१७]
एकूण २७८ १९२ ९७

यातील किती ऑप्शन ए३२०-२०० आणि किती ए३२०निओ प्रकाराची आहेत याची गणती दिलेली नाही.[११]

ताफ्याचा इतिहास

लुफ्तांसाचे बोईंग ७३७-२०० पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर १९८३मध्ये उतरताना. शेपटीवरील चित्र उलट रंगसंगतीत आहे तर विमानाला रंग दिलेला नाही
बोईंग ७४७-२०० प्रकारचे विमान १९८९मध्ये फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना. ही रंगसंगती यानंतर लगेचच निवृत्त करण्यात आली व सध्याची रंगसंगती वापरण्यास सुरुवात झाली
बोईंग ७६७-३०० स्टार अलायन्सच्या रंगसंगतीत २००३ मध्ये फ्रांकफुर्ट विमानतळावर उभे असताना

लुफ्तांसाने आपल्या इतिहासात खालील प्रकारची विमाने वापरली आहेत:[१८]

Lufthansa Mainline Historical Fleet since 1955
प्रकार सेवेत रुजू निवृत्त नोंदी
एरबस ए३०० १९७६ १९८४
एरबस ए३००-६०० १९८७ २००९
एरबस ए३१० १९८४ २००५
एरबस ए३१९ १९९६
एरबस ए३३० १९८९
एरबस ए३२१ १९९४
एरबस ए३३०-२०० २००२ २००६
एरबस ए३३०-३०० २००४
एरबस ए३४०-२०० १९९३ २००६
एरबस ए३४०-३०० १९९३
एरबस ए३४०-६०० २००३
एरबस ए३८० २०१०
बोईंग ७०७ १९६० १९८४ मालवाहू आणि प्रवासी
बोईंग ७२० १९६१ १९६५
बोईंग ७२७-१०० १९६४ १९७९ आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७२७-२०० १९७१ १९९३
बोईंग ७३७-१०० १९६७ १९८२ सिटी जेट नावाने या प्रकाराचा पहिला वापरकर्ता
बोईंग ७३७-२०० १९६९ १९९७ आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७३७-३०० १९८६ आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७३७-४०० १९९२ १९९८
बोईंग ७३७-५०० १९९०
बोईंग ७४७-१०० १९७० १९७९
बोईंग ७४७-२०० १९७१ २००४ प्रवासी आणि मालवाहू
बोईंग ७४७-४०० १९८९
बोईंग ७४७-८आय २०१२ सर्वप्रथम वापरकर्ता
बोईंग ७६७-३०० 1994
२००३
1996
२००४
काँडोर फ्लुडीएन्स्टकडून भाडेतत्त्वावर[१९]
कॉन्व्हेर सीव्ही-२४०/३४०/४४० १९५५ १९६८
कर्टीस सी-४६ कमांडो १९६४ १९६९ भाडेतत्त्वावर घेतलेली मालवाहू विमाने
डग्लस डीसी-३ १९५५ १९६० प्रवासी आणि मालवाहू
डग्लस डीसी-४ १९५८ १९५९ एकमात्र मालवाहू विमान
डग्लस डीसी-६ १९६५ १९६६ एकमात्र मालवाहू विमान
मॅकडोनेल डग्लस डीसी-१० १९७४ १९९४
फोकर एफ२७ फ्रेंडशिप ~१९६५ ~१९६६ Leased from Condor
लॉकहीड कॉन्स्टेलेशन १९५५ १९६७ प्रवासी आणि मालवाहू
व्हिकर्स व्हीसी.१ व्हायकिंग १९५६ १९६१ दोन मालवाहू विमाने
व्हिकर्स व्हायकाउंट १९५८ १९७१

विमानांचे नामकरण करण्याची पद्धत

सप्टेंबर १९६०मधे लुफ्तांसाने आपल्या D-ABOC या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे नामकरण बर्लिन असे केले. फ्रांकफुर्ट ते न्यू यॉर्क मार्गावर प्रवास करणाऱ्या या विमानाचे नाव तेव्हाच्या पश्चिम बर्लिनच्या महापौर विली ब्रँटने केले होते. यानंतर लुफ्तांसाने आपल्या ७०७ विमानांना हांबुर्ग, फ्रांकफुर्ट, म्युन्शेन आणि बॉन अशी नावे दिली. यानंतर कंपनीने आपल्या विमानांना जर्मनीमधील शहरे, गावे आणि राज्यांची नावे देण्याची प्रथा सुरू केली. विमानांचा आकार आणि शहराच्या आकारात साम्य ठेवून ही नावे दिली जातात. याशिवाय एका एरबस ए३४०-३००ला (D-AIFC) लुफ्तांसाने गँडर/हॅलिफॅक्स असे नाव दिले आहे. जर्मनीमध्ये नसलेल्या शहराचे नाव असलेले हे लुफ्तांसाच्या दोनपैक एक विमान आहे. ही दोन्ही शहरे कॅनडामध्ये असून युरोप ते उत्तर अमेरिकेच्या वाटेवर आहेत. सप्टेंबर ११, २००१च्या हल्ल्यांनंतर उत्तर अमेरिकेतील सगळ्या विमानांना तात्काळ जमिनीवर उतरणे भाग पाडले गेले तेव्हा अनेक विमानांनी या दोन शहरांत आश्रय घेतला होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी या विमानांतील प्रवाशांचा केलेल्या पाहुणचाराची दखल म्हणून हा सन्मान दिला गेला आहे. जर्मन शहराचे नाव नसलेले दुसरे विमान D-AIRA हे फिंकेनवेर्डर नावाचे एरबस ए३२१-१०० विमान आहे. या शहरात एरबसची ४०% नॅरोबॉडी[मराठी शब्द सुचवा] विमाने बनवली जातात.

लुफ्तांसाच्या ए३८० प्रकारच्या पहिल्या दोन विमानांना फ्रांकफुर्ट आम मेन आणि म्युन्शेन ही नावे दिली गेली तर इतर ए३८० विमानांना स्टार अलायन्सचे मुख्य तळ असलेल्या तोक्यो, बीजिंग, ब्रसेल्स आणि न्यू यॉर्कची नावे दिली गेली आहे.

ऐतिहासिक विमानांचे पुनरुत्थान

लुफ्तांसा टेक्निक या लुफ्तांसाच्या विमानांची देखभाग करणाऱ्या विभागाने १९३६ साली तयार केलेले युंकर्स जेयु ५२-३एम प्रकारच्या विमानाचे अवशेष व सुटे भाग गोळा करून त्यास पुन्हा प्रवास करण्यालायक बनवले आहे. हे विमान १९३०च्या दशकात बर्लिन ते रोम या मार्गावर कार्यरत होते. यानंतर लुफ्तांसा टेक्निकने लॉकहीड सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारची तीन विमाने लिलावात विकत घेतली व त्यांतील भाग वापरून एक पूर्ण विमान तयार करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सुपर कॉन्स्टेलेशन तसेच एल१६४९ स्टारलायनर प्रकारची विमाने हांबुर्ग-माद्रिद-डकार-काराकास-सांतियागो मार्गावर प्रवास करीत असत. या व अशा कामांसाठी लुफ्तांसा टेक्निक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांची भरती करते.[२०][२१]

Other Languages
Afrikaans: Lufthansa
Alemannisch: Lufthansa
العربية: لوفتهانزا
авар: Lufthansa
azərbaycanca: Lufthansa
Boarisch: Lufthansa
беларуская: Lufthansa
български: Луфтханза
भोजपुरी: लुफ़्थान्सा
bosanski: Lufthansa
català: Lufthansa
čeština: Lufthansa
dansk: Lufthansa
Deutsch: Lufthansa
Zazaki: Lufthansa
Ελληνικά: Lufthansa
English: Lufthansa
Esperanto: Lufthansa
español: Lufthansa
eesti: Lufthansa
euskara: Lufthansa
suomi: Lufthansa
français: Lufthansa
Frysk: Lufthansa
Gaeilge: Lufthansa
galego: Lufthansa
客家語/Hak-kâ-ngî: Lufthansa Hòng-khûng
עברית: לופטהנזה
hrvatski: Lufthansa
magyar: Lufthansa
Հայերեն: Lufthansa
Bahasa Indonesia: Lufthansa
íslenska: Lufthansa
italiano: Lufthansa
Basa Jawa: Lufthansa
қазақша: Lufthansa
한국어: 루프트한자
Latina: Lufthansa
Lëtzebuergesch: Deutsche Lufthansa
lietuvių: Lufthansa
latviešu: Lufthansa
मैथिली: लुफ्थान्सा
Malagasy: Lufthansa
македонски: Луфтханза
മലയാളം: ലുഫ്താൻസ
Bahasa Melayu: Lufthansa
नेपाली: लुफ्थान्सा
Nederlands: Lufthansa
norsk nynorsk: Lufthansa
norsk: Lufthansa
Sesotho sa Leboa: Lufthansa
occitan: Lufthansa
polski: Lufthansa
پنجابی: لفتہانزا
português: Lufthansa
română: Lufthansa
русский: Lufthansa
саха тыла: Lufthansa
sicilianu: Lufthansa
Scots: Lufthansa
srpskohrvatski / српскохрватски: Lufthansa
Simple English: Lufthansa
slovenčina: Lufthansa
slovenščina: Lufthansa
српски / srpski: Луфтханза
svenska: Lufthansa
తెలుగు: లుఫ్తాన్సా
Türkçe: Lufthansa
татарча/tatarça: Lufthansa
українська: Lufthansa
Tiếng Việt: Lufthansa
中文: 汉莎航空
粵語: 漢莎航空