मेमरी

मेमरी ही एक डेटा सूचना आणि माहिती सांभाळणारा विभाग असतो. मायक्रोप्रोसेसर्स प्रमाणेच मेमरी देखील सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चकतीवर बसविलेली असते. मेमरीचे तीन प्रकार आहेत रँडम एक्सेस मेमरी, रिड ओन्ली मेमरी आणि फ्लॅश मेमरी.

रॅम

अल्ट=विविध मेमरी|इवलेसे|388x388अंश|विविध मेमरी रँडम एक्सेस मेमरी चकतीमध्ये  सूचना क्रम आणि सीपीयू सध्या प्रक्रिया करीत असलेला डेटा सामावलेला असतो. रॅमला अस्थिर किंवा तात्पुरती साठवण म्हणतात,कारण रॅमच्या बऱ्याच प्रकारांमध्ये मायक्रो कॉम्प्युटर बंद केला की लगेच रॅमवरचा डेटा जातो. जर वीज बंद पडली किंवा मायक्रोकॉम्प्युटरकडे जाणाऱ्या वीज प्रवाहात अडथळा आल्यास सर्व मजकूर जातो. यांच्याविरुद्ध दुय्यम साठवण ती आपले समाविष्ट भाग गमावत नाही. तो कायम स्थिर वा कायम साठा असतो. जसा काही हार्डडिस्कवर सांभाळलेलं डेटाच.

या कारणामुळे तर वर नमूद केलेल्या रॅमला तात्पुरती साठवण म्हणतात. कारण मायक्रो कॉम्प्युटर बंद होतो त्या क्षणीच रॅमवरची  सर्व माहिती पुसली जाते, म्हणूनच चालू कामांचा डेटा वारंवार दुय्यम साठवण  उपकरणांमध्ये साठवून ठेवण्याची कल्पना छान आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कागदपत्रांचे, एखाद्या स्प्रेडशीटचे काम करीत असाल, दर थोड्या मिनिटांनी तुम्ही तुमचे काम जतन किंवा स्टोअर करायला पाहिजे.

कॅच (उच्चार "कॅश" असा करतात.) मेमरी सीपीयू आणि मेमरीमध्ये तात्पुरत्या जलदगतीच्या समाविष्ट विभागासारखे काम करून प्रक्रियेत सुधारणा करते. रॅम मधली कोणती माहिती वारंवार वापरली जाते हे संगणक शोधून काढतो आणि मग त्याची "कॅश" मध्ये नोंद करतो.गरज असेल तेव्हा सीपीयु कॅश मधून ती माहिती झटकून घेतो. रॅम पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. उदा मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ परिणामकारकतेने वापरण्यासाठी तुम्हाला किमान २५६ एमबी रॅम प्रोग्रॅम सामावायाला आणि अन्य ५१२ एमबी - १०२४ एमबी रॅम ऑपरेटिंग सिस्टीमला आवश्यक असते. काही ॲप्लिकेशन जसे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर  अशांना तर जास्त रॅमची ही गरज भासू शकते. सुदैवाने गोष्ट म्हणजे एखाद्या संगणक प्रणालीत या अतिरिक्त रॅमची एखाद्या डीआय एमएम द्वारे (डय़ुअल इन मेमरी मॉडयुल) विस्तारित मॉड्यूल म्हणून सिस्टीम बोर्डमध्ये भर करता येते. रॅमची क्षमता बाईट्समधे व्यक्त केली जाते. मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी सर्वसाधारणतः मोजमापाची तीन एकके वापरली जातात.

अन्य प्रकारच्या रॅममध्ये डी रॅम, एडी रॅम, डीडीआर आणि थेट आरडी रॅम यांचा समावेश होतो.

जरी तुमच्या संगणकापाशी एखादा प्रोग्रॅम साठवायला पुरेशी रॅम नसली तरीही व्हर्चुअल मेमरी वापरून तो प्रोग्रॅम चालवणे त्याला जमू शकेल. आजकालच्या ऑप्रेटिंग सिस्टीमपैकी बर्याचश्या व्हर्चुअल मेमरीला सहाय्यक होतात. व्हर्चुअल मेमरीच्या मदतीने मोठया प्रोग्रामचे लहान विभाग करतात आणि ते नेहमी एखादया हार्ड डिस्कवरती दुय्यम मेमरीत साठवले जातात. मग प्रत्येक भाग रॅममध्ये गरजेनुसार वाचला जातो अशाप्रकारे संगणक प्रणाल्या मोठमोठे प्रोग्रम्स चालवू शकतात.

Other Languages
العربية: ذاكرة
অসমীয়া: স্মৃতি শক্তি
Aymar aru: Amuyu
azərbaycanca: Yaddaş (psixologiya)
башҡортса: Хәтер
Boarisch: Gmiak
беларуская: Памяць
беларуская (тарашкевіца)‎: Памяць
български: Памет
বাংলা: স্মৃতি
čeština: Paměť
dansk: Hukommelse
Deutsch: Gedächtnis
Ελληνικά: Μνήμη
English: Memory
Esperanto: Memoro
eesti: Mälu
euskara: Oroimen
suomi: Muisti
Gaeilge: Cuimhne
galego: Memoria
Avañe'ẽ: Mandu'a
עברית: זיכרון
hrvatski: Pamćenje
magyar: Emlékezet
հայերեն: Հիշողություն
interlingua: Memoria
Bahasa Indonesia: Ingatan
íslenska: Minni
italiano: Memoria
日本語: 記憶
ქართული: მეხსიერება
қазақша: Ес
ಕನ್ನಡ: ನೆನಪು
한국어: 기억
kurdî: Bîrkan
Кыргызча: Эс
Latina: Memoria
Lingua Franca Nova: Memoria
lietuvių: Atmintis
latviešu: Atmiņa
македонски: Меморија
മലയാളം: ഓർമ്മ
Bahasa Melayu: Ingatan
Mirandés: Mimória
မြန်မာဘာသာ: မှတ်ဉာဏ်
مازِرونی: حافظه
नेपाल भाषा: लुमन्ति
norsk: Hukommelse
português: Memória
Runa Simi: Yuyay
română: Memorie
русский: Память
sicilianu: Ricordiu
srpskohrvatski / српскохрватски: Pamćenje
Simple English: Memory
slovenščina: Spomin
shqip: Kujtesa
српски / srpski: Памћење
svenska: Minne
Kiswahili: Kumbukumbu
Tagalog: Alaala
Türkçe: Bellek
українська: Пам'ять
Tiếng Việt: Trí nhớ
Winaray: Memorya
ייִדיש: זכרון
中文: 記憶
Bân-lâm-gú: Kì-ek
粵語: 記憶