मायक्रोसॉफ्ट विंडोज

मायक्रोसॉफ्ट विंडोज
Windows 8 logo and wordmark.svg
विंडोजची आवृत्ती
प्रारंभिक आवृत्तीनोव्हेंबर २०, १९८५ (विंडोज १.०)
सद्य आवृत्तीविंडोज ८, विंडोज सर्व्हर २०१२
एनटी ६.२ बिल्ड ९२०० (ऑक्टोबर २६, इ.स. २०१२)
विकासाची स्थितीसद्य
प्रणालीलेखनाची भाषासी, सी++, असेंब्ली
प्लॅटफॉर्मx८६
भाषाअनेक (विंडोज ७ च्या भाषा)
सॉफ्टवेअरचा प्रकारसंगणक संचालन प्रणाली
परवानाप्रताधिकारित
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट.कॉम

मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [१]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटूमोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत.

आवृत्त्या

हे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी

विंडोज हा शब्द एक वा अनेक मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्यांचे वर्णन करतो. या उत्पादनांचे त्यांच्या वापराच्या दृष्टीने सामान्यपणे तीन वर्ग पडतात.

  1. खाजगी
  2. सर्व्हर
  3. मोबाईल

जुन्या आवृत्त्या

चित्र:Windows1.0.png
विंडोज १.०, १९८५ साली प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती

विंडोजचा इतिहास आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे नेतो, जेव्हा "चेस बिशप" नावाच्या संगणकशास्त्रज्ञाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरण संरचना तयार केली व "अंतरफलक व्यवस्थापक" (इंटरफेस मॅनेजर) हा प्रकल्प सुरू झाला. तो "विंडोज" या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये (अ‍ॅपल लिसा नंतर पण मॅकिंटॉशच्या आधी) घोषित झाला खरा, पण नोव्हेंबर इ.स. १९८५ पर्यंत विंडोज प्रकाशित झाली नाही. विंडोज १.० चे बाह्यावरण एमएस-डॉस एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रोग्रॅम होता. गणकयंत्र, दिनदर्शिका, कार्डफाइल, क्लिपबोर्ड दर्शक, घड्याळ, कंट्रोल पॅनल, नोंदीलेखक (नोटपॅड), पेंट, रिव्हर्सी, टर्मिनल, राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते. विंडोज १.० मध्ये एकावर एक खिडकी (विंडो) आणता येत नसे. केवळ चौकटीच इतर खिडक्यांवर येऊ शकत असत.

ऑक्टोबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित झाली. तिच्यात वापरकर्ता अंतरफलक व स्मृती व्यवस्थापनामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिच्यामध्ये एकावर एक खिडकी आणता येऊ लागली शिवाय तिच्यात आणखी जटिल कळफलक-लघुपथ (कीबोर्ड-शॉटकट) होते. ती विस्तारलेली स्मृतीसुद्धा वापरू शके.

विंडोज २.१ विंडोज/३८६ व विंडोज/२८६ या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली.

विंडोजच्या जुन्या आवृत्त्या केवळ ग्राफिकल यूजर इंटरफेस मानल्या जात कारण त्या जास्त प्रमाणात एम-एस डॉसवरच चालत असत व त्याचा संचिका प्रणाली सेवांसाठी उपयोग करत. तरीही, सर्वात आद्य १६-बिट विंडोजमध्ये अनेक संचालन प्रणाली फंक्शन्स व त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटेबल संचिका प्रकारही स्वीकृत केले होते तसेच त्यांचे स्वतःचे उपकरण चालक (टायमर, ग्राफिक्स, प्रिंटर, माऊस, कळफलक व ध्वनी) अ‍ॅप्लिकेशन्ससाठी प्रदान केले होते. एमएस-डॉसच्या उलट विंडोज वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक चित्रमय अ‍ॅप्लिकेशन्स एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सहकारी माध्यमातून एक्झिक्युट करू देते.

विंडोज ३.० व ३.१

विंडोज ३.० (१९९०) व ३.१ (१९९२) यांनी आभासी स्मृती व लोड करण्यायोग्य आभासी डिव्हाइस चालक यांच्या कारणास्तव रचना सुधारली. विंडोजचे प्रयोग आता सुरक्षित रीतीमध्ये चालू शकत होते, (जेव्हा विंडोज साध्या किंवा ३८६ वाढवलेल्या रीतीमध्ये चालत होती तेव्हा) ज्यामुळे त्यांना स्मृतीचे अनेक मेगाबाइट खुले झाले व सॉफ्टवेर आभासी स्मृती योजनेत भाग घेण्याचे बंधन दूर झाले. विंडोज ३.० साठी मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण कार्ये सी भाषेतून असेंब्ली भाषेत लिहित असे.

विंडोज ९५, ९८ व एमई

चित्र:Am windows95 desktop.png
१९९५ साली प्रकाशित झालेले विंडोज ९५

विंडोज ९५ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली. तिच्यात नवीन वापरकर्ता व्यक्तिरेखा, २५५ अक्षरांपर्यंत लांब संचिकानामांसाठी समर्थन, व आपोआप स्थापन केलेले हार्डवेअर[मराठी शब्द सुचवा] ओळखणे ही नवीन साधने होती. ती ३२-बिट प्रयोग चालवू शकत असे व अनेक तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे तिची स्थिरता विंडोज ३.१ पेक्षा वाढली. तिच्यात अनेक ओईएम सेवा प्रकाशने झाली. त्यातील प्रत्येक प्रकाशन सर्व्हिस पॅकच्या तुल्यबळ होते.

मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन विंडोज ९८ जून १९९८ साली प्रकाशित झाले. मायक्रोसॉफ्टने १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली. तिचे नाव विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (सेकंड एडिशन) होते. त्याचा लघुपथ विंडोज ९८ एसई असा करण्यात आला.

फेब्रुवारी २००० मध्ये विंडोज २००० प्रकाशित झाली. तिच्यापाठोपाठ विंडोज एमई प्रकाशित झाली. (एमई हा मिलेनियम एडिशनचा लघुपथ आहे.) विंडोज एमईने विंडोज ९८ कडून गाभा अद्ययावत केला असला तरी विंडोज २००० कडून काही पैलू अद्ययावत केले व "बूट इन डॉस मोड" हा पर्याय काढला आणि प्रणाली पुनर्स्थापन हा नवीन पर्याय आणला. त्यामुळे वापरकर्त्याला संगणकाच्या सेटिंग्समध्ये तारीख बदलण्याची मुभा मिळाली.

विंडोज एनटी मालिका

चित्र:Windows NT 3.1.png
१९९३ साली प्रकाशित झालेले विंडोज एनटी ३.१

विंडोज एनटी मालिकेतील प्रणाल्या उच्च विश्वसनीयतेच्या व्यावसायिक उपयोगांसाठी बाजारात आणल्या गेल्या. पहिले प्रकाशन होते एनटी ३.१ (१९९३), ग्राहक विंडोज आवृत्तीशी जुळावे म्हणून हा क्रमांक ठेवण्यात आला होता, त्यानंतरची प्रकाशने एनटी ३.५ (१९९४), एनटी ३.५१ (१९९५), एनटी ४.० (१९९६), व विंडोज २०००, उत्पादन सक्रीयीकरण उपलब्ध नसलेले हे शेवटचे एनटी-आधारित प्रकाशन होते. एनटी ४.० ही विंडोज ९५ ची वापरकर्ता व्यक्तिरेखा वापरणारी या मालिकेतील पहिली प्रणाली होती. (आणि विंडोज ९५ चे बिल्ट-इन[मराठी शब्द सुचवा] ३२-बिट रनटाइम्स वापरणारी देखील पहिलीच.)

मायक्रोसॉफ्टने नंतर प्रकाशित केलेल्या विंडोज एक्सपीने ग्राहकांना व व्यापारी संचालन प्रणाल्यांना आपल्याकडे खेचले. ती घरगुती व व्यापारी अशा दोन्ही आवृत्त्यांत उपलब्ध होती. (नंतर ती टॅब्लेट संगणक व मीडिया केंद्र या स्वरूपातही उपलब्ध झाली.) सर्व्हर संचालन प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्टने वेळापत्रक बदलले. दीड वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या विंडोज सर्व्हर २००३ ने विंडोज सर्व्हरला विंडोज एक्सपीबरोबर आणले. लांबलचक विकासप्रक्रियेनंतर विंडोज व्हिस्टा २००६ च्या शेवटी प्रकाशित झाली. तिच्याबरोबरची सर्व्हर संचालन प्रणाली विंडोज सर्व्हर २००८ ही २००८ च्या सुरूवातीला प्रकाशित झाली. २२ जुलै २००९ रोजी विंडोज ७विंडोज सर्व्हर २००८ आरटू आरटीएम (रिलीज टू मॅन्युफॅक्चरिंग - उत्पादनासाठी प्रकाशित) म्हणून प्रकाशित झाल्या. विंडोज ७ ही २२ ऑक्टोबर २००९ रोजी प्रकाशित झाली.

६४-बिट संचालन प्रणाल्या

एक्स८६ आधारित खासगी संगणकांचा जम बसण्यापूर्वी विंडोज एनटी अनेक विविध प्लॅटफॉर्मना समर्थित करे. एनटी ३.१ ते ४.० पर्यंत पॉवरपीसी, डेक अल्फा, एमआयपीएस आर४००० अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना समर्थित करत असत, ज्यांच्यात ६४-बिट प्रक्रियाकारही असत, त्यांना प्रणाली ३२-बिट प्रक्रियाकारांप्रमाणे वागवत असे.

मायक्रोसॉफ्टने इंटेल इटॅनियमच्या (आयए-६४ म्हणूनही ज्ञात) उदयाबरोबर त्यास समर्थन देणारी विंडोज प्रकाशने काढली. विंडोज एक्सपी व विंडोज सर्व्हर २००३ च्या इटॅनियम आवृत्त्या त्यांच्या एक्स-८६ (३२-बिट) आवृत्त्यांबरोबरच प्रकाशित झाल्या. एप्रिल २५, २००५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी एक्स६४-बिट आवृत्ती व विंडोज सर्व्हर एक्स६४ आवृत्त्या प्रकाशित केल्या. विंडोज एक्सपीच्या इटॅनियम आवृत्त्यांसाठीचे समर्थन २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टने काढून घेतले. विंडोज व्हिस्टा ही विंडोजची पहिली आवृत्ती आहे जिच्यात एक्स६४ व एक्स८६ आवृत्त्यांचे प्रकाशन एकदम झाले. विंडोज व्हिस्टा इटॅनियमला समर्थन देत नाही. विंडोज सर्व्हर २००८ आरटू ने ३२-बिट आवृत्ती गाळली पण विंडोज ७ ने तिला समर्थन ठेवले.

विंडोज सीई

चित्र:WindowsCE7.png
आगामी विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ७ मधील मीडिया चालक कसा असू शकतो हे दाखवणारी झलक

विंडोज सीई (अधिकृतरीत्या विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट) ही उपग्रह दिशादर्शक प्रणाल्यांवर व भ्रमणध्वनींवर चालणारी विंडोजची आवृत्ती आहे. विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ही स्वतःचे केर्नेल वापरते.

आगामी प्रणाल्या

मुख्य पान: विंडोज ८
विंडोज ७ ची उत्तराधिकारी असलेली विंडोज ८ सध्या विकसनशील आहे. मायक्रोसॉफ्टच्या २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या डच भाषेतील ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे विंडोज ८ आणखी दोन वर्षांनी प्रकाशित होईल. विंडोज 10 ही सध्या उपलब्ध असलेली सगळ्यात नवीन प्रणाली आहे विंडोज मोबाइल आता अस्तित्वात नाही

Other Languages
অসমীয়া: ৱিণ্ড'জ
azərbaycanca: Microsoft Windows
žemaitėška: Microsoft Windows
беларуская: Windows
беларуская (тарашкевіца)‎: Microsoft Windows
български: Microsoft Windows
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Microsoft Windows
corsu: Windows
Ελληνικά: Microsoft Windows
føroyskt: Windows
עברית: Microsoft Windows
hornjoserbsce: Windows
magyar: Windows
interlingua: Microsoft Windows
Bahasa Indonesia: Microsoft Windows
la .lojban.: la canko
ქართული: Microsoft Windows
Qaraqalpaqsha: Microsoft Windows
қазақша: Microsoft Windows
Ripoarisch: Microsoft Windows
Кыргызча: Microsoft Windows
Lëtzebuergesch: Microsoft Windows
Limburgs: Windows
lumbaart: Windows
македонски: Microsoft Windows
монгол: Microsoft Windows
Bahasa Melayu: Microsoft Windows
Dorerin Naoero: Microsoft Windows
Plattdüütsch: Microsoft Windows
Nederlands: Microsoft Windows
norsk nynorsk: Microsoft Windows
occitan: Windows
português: Microsoft Windows
Runa Simi: Windows
русский: Windows
русиньскый: Microsoft Windows
саха тыла: Microsoft Windows
srpskohrvatski / српскохрватски: Microsoft Windows
Simple English: Microsoft Windows
slovenčina: Microsoft Windows
slovenščina: Microsoft Windows
Soomaaliga: Microsoft Windows
తెలుగు: విండోస్
тоҷикӣ: Microsoft Windows
татарча/tatarça: Microsoft Windows
українська: Microsoft Windows
oʻzbekcha/ўзбекча: Microsoft Windows
vepsän kel’: Microsoft Windows
Tiếng Việt: Microsoft Windows
West-Vlams: Windows
吴语: 微软视窗
მარგალური: Microsoft Windows
ייִדיש: Windows
Bân-lâm-gú: Microsoft Windows