मराठी भाषा

मराठी भाषा
मराठी
स्थानिक वापर भारत, मॉरिशसइस्रायल
प्रदेश महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू
लोकसंख्या ७,००,००,००० (प्रथमभाषा)
२,००,००,००० (द्वितीयभाषा)
क्रम १५
बोलीभाषा अहिराणी, कोकणी, आगरी, माणदेशी, मालवणी, वर्‍हाडी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय

 इंडो-इराणीय
  इंडो-आर्य
   इंडो-आर्य दक्षिण विभाग
    मराठी

  • मराठी भाषा
लिपी देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली
भाषा संकेत
ISO ६३९-१ mr
ISO ६३९-२ mar
ISO ६३९-३ mar

Marathi modi script.PNG
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. [१] मराठी बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात.

मराठीभाषी प्रदेश

मराठी भाषा भारतासह मॉरिशसइस्रायल या देशांतही बोलली जाते. [२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलियान्यू झीलंड येथेही बोलली जाते. [३]

भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडूछत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- दक्षिण गुजरात, सुरत, बडोदाअहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू), वगैरे. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.

Other Languages
Afrikaans: Marathi
العربية: لغة مراثية
مصرى: مراتى
অসমীয়া: মাৰাঠী ভাষা
asturianu: Idioma marathi
azərbaycanca: Marathi dili
Bikol Central: Marati
беларуская: Маратхі (мова)
беларуская (тарашкевіца)‎: Маратгі (мова)
български: Маратхи
भोजपुरी: मराठी
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: মারাঠি ঠার
brezhoneg: Marateg
català: Marathi
čeština: Maráthština
Cymraeg: Marathi
Deutsch: Marathi
Zazaki: Meratki
ދިވެހިބަސް: މަރާޓީ
Ελληνικά: Μαράτι (γλώσσα)
Esperanto: Marata lingvo
español: Idioma marathi
euskara: Marathera
français: Marathi (langue)
गोंयची कोंकणी / Gõychi Konknni: मराठी
ગુજરાતી: મરાઠી ભાષા
客家語/Hak-kâ-ngî: Marathi-ngî
עברית: מראטהית
हिन्दी: मराठी भाषा
Fiji Hindi: Marathi bhasa
hrvatski: Marathi jezik
Bahasa Indonesia: Bahasa Marathi
íslenska: Marathí
italiano: Lingua marathi
ქართული: მარათული ენა
ಕನ್ನಡ: ಮರಾಠಿ
한국어: 마라티어
коми: Маратхи
Кыргызча: Маратхи тили
lietuvių: Marathų kalba
latviešu: Marathu valoda
मैथिली: मराठी भाषा
Malagasy: Fiteny Marathi
മലയാളം: മറാഠി ഭാഷ
монгол: Марати хэл
Bahasa Melayu: Bahasa Marathi
नेपाली: मराठी भाषा
नेपाल भाषा: मराठी भाषा
Nederlands: Marathi (taal)
norsk nynorsk: Marathi
norsk: Marathi
occitan: Marata
Piemontèis: Lenga marathi
پنجابی: مراٹھی
português: Língua marata
Runa Simi: Marathi simi
română: Limba marathi
संस्कृतम्: मराठीभाषा
srpskohrvatski / српскохрватски: Marathi jezik
Simple English: Marathi language
slovenčina: Maráthčina
српски / srpski: Маратхи језик
svenska: Marathi
Kiswahili: Kimarathi
తెలుగు: మరాఠీ భాష
Türkçe: Marathi
ئۇيغۇرچە / Uyghurche: ماراتىچە
українська: Маратхі (мова)
Tiếng Việt: Tiếng Marathi
მარგალური: მარათული ნინა
中文: 马拉地语
Bân-lâm-gú: Marathi-gí
粵語: 馬拉地文