कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती

कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीकरिता वापरले जाणारे स्पेक्ट्रोमीटर

पुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती (इंग्रजी: Radiocarbon dating, रेडिओकार्बन डेटिंग ;) उपयोगात आणली जाते. याचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला. प्रत्येक सजीव गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असते. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ किरणोत्सर्गी आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन १४ चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन १४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाचप्रकारे नंतरच्या १११३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन १४ शिल्लक राहतो आणि ७०००० वर्षांनी या कार्बन १४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते. आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरविता येते. अलीकडच्या काळातील उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत. सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला.

Other Languages
Bahasa Indonesia: Penanggalan radiokarbon
Nederlands: C14-datering
norsk nynorsk: Radiokarbondatering
srpskohrvatski / српскохрватски: Radiokarbonsko datiranje
Simple English: Radiocarbon dating