कल्पना चावला

कल्पना चावला

कल्‍पना चावला ( मार्च १७ इ.स. १९६२: कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३: टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

बालपण

कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.

Other Languages
беларуская: Калпана Чаўла
български: Калпана Чаула
español: Kalpana Chawla
français: Kalpana Chawla
ગુજરાતી: કલ્પના ચાવલા
Bahasa Indonesia: Kalpana Chawla
italiano: Kalpana Chawla
ភាសាខ្មែរ: Kalpana Chawla
한국어: 칼파나 촐라
Malagasy: Kalpana Chawla
മലയാളം: കൽപന ചൗള
Nederlands: Kalpana Chawla
پنجابی: کلپنا چاولہ
português: Kalpana Chawla
română: Kalpana Chawla
संस्कृतम्: कल्पना चावला
Simple English: Kalpana Chawla
slovenčina: Kalpana Chawlová
Türkçe: Kalpana Chawla
українська: Калпана Чавла