इस्रायलचे पंतप्रधान

इस्रायलचे पंतप्रधान
Flag of the Prime Minister of Israel.svg
इस्रायलचे पंतप्रधानांचा ध्वज
Benjamin Netanyahu portrait.jpg
पदस्थ
बिन्यामिन नेतान्याहू

३१ मार्च २००९ पासून
शैलीमहामहिम
नियुक्ती कर्ताइस्रायलचे राष्ट्रपती
कालावधी४ वर्ष (कमाल)
निर्मिती१४ मे १९४८
पहिले पदधारकडेव्हिड बेन-गुरियन
संकेतस्थळpmo.gov.il

इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासुन बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.

पात्रता, अधिकार आणि कर्तव्ये

इस्त्रायलची लिखीत राज्यघटना नाही; पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे एखाद्या देशाच्या राज्यघटने सारखे महत्त्वाचे आहेत. इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायलचे नागरीक असणे व ते क्नेसेट मध्ये निवडुन यावे गरजेचे आहे. पंतप्रधान व इतर मंत्रीमंडळ मिळुन इस्रायलचे सरकार बनते. उपपंतप्रधान या पदाची पण सोय पण मूलभूत कायद्यात आहे. निवडणुकी नंतर पंतप्रधान होण्यासाठी बहुसंख्य पाठींबा असलेला व्यक्ति इस्रायलच्या राष्ट्रपतींकडे आपली उमेदवारी देतो आणि निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्या नंतर सात दिवसाच्या आत राष्ट्रपती पंतप्रधान जाहिर होतो. पंतप्रधानांच्या मृत्युच्या वेळी हा कालावधी चौदा दिवसांचा असतो ज्यात नव्या अथवा प्रभारी पंतप्रधानाची नियुक्ती होते.[१]

Other Languages
čeština: Premiér Izraele
Bahasa Indonesia: Perdana Menteri Israel
македонски: Премиер на Израел
Bahasa Melayu: Perdana Menteri Israel
norsk nynorsk: Statsminister i Israel
Simple English: Prime Minister of Israel
српски / srpski: Премијер Израела
Tiếng Việt: Thủ tướng Israel