आर्नोल्ड श्वार्झनेगर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
आर्नोल्ड श्वार्झनेगर‎
आर्नोल्ड श्वार्झनेगर


कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
नोव्हेंबर १७ २००३
लेफ्टनंटक्रूज बुस्टामँटे
(२००३–२००७)
जॉन गॅरामँडी
(२००७–विद्यमान)
कार्यकाळ
१९९० – १९९३
राष्ट्रपतीजॉर्ज डब्ल्यु. बुश

जन्म३० जुलै, १९४७ (1947-07-30) (वय: ७१)
ग्राझ जवळील थाल,ऑस्ट्रिया
राष्ट्रीयत्वऑस्ट्रियन- अमेरिकन
राजकीय पक्षरिपब्लिकन
पत्नीमारिया श्रीवर
अपत्ये
निवासलॉस एंजेलेस कॅलिफोर्निया
शिक्षणविस्कॉन्सिन-सुपिरिअर विद्यापीठ
व्यवसायशरीरसैष्ठव,अभिनेता, राजनितिज्ञ, व्यापारी (गुंतवणूक)
धर्मरोमन कॅथलिक
संकेतस्थळकॅलिफोर्निया राज्यपाल अधिकृत संकेतस्थळ
श्वार्झनेगर‎ डॉट कॉम

अरनॉल्ड श्वार्झनेगर हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर आहेत. राज्याचे गव्हर्नर या पेक्षाही ऍक्शन चित्रपटातील भूमिका व शरीरसैष्ठव या खेळ प्रकारातील कारकीर्दीसाठी त्यांचे संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत. शरीरसैष्ठवातील निर्विवाद बादशहा म्हणून आजही ओळखले जातात. १९६० व ७० च्या दशकात अरनॉल्ड यांनी अनेक शरीर सैष्ठव स्पर्धा जिंकल्या व सर्वात मानाचे मि.ऑलिंपीया हा किताब सलग ७ ते ८ वर्षे जिंकला. असे म्हणतात की मिस्टर युनिव्हर्स च्या अकादमीने त्यांना इतर स्पर्धकांना जिंकून येण्यासाठी स्पर्धेत भाग न घेण्यासाठी विनंती केली. शरीर सैष्ठ्व उमेदीच्या काळात अरनॉल्ड ऑस्ट्रियन ओक या टोपणनावाने ओळखले जात. शरीर सैष्ठ्व मधून लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी हॉलिवूडमध्ये आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत अनेक चित्रपटात भूमिका केल्या त्यांच्या बहुतेक भूमिका ऍक्शन चित्रपटातील आहेत. कसलेले अभिनेता व जबरदस्त अभिनय नसला तरी बहुतेक सर्व चित्रपटातून आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पाडला व बहुतेक सर्वच चित्रपटांना आपार लोकप्रियता मिळवून दिली. कोनॅन द बार्बारियन, कमांडो, टर्मिनेटर , द प्रिडेटर , रेड हॉट, ट्रू लाईज या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. वयानुसार आपले क्षेत्र बदलण्यात हातखंडा असलेल्या अरनॉल्ड यांनी राजकारणात पूर्ण वेळ सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, सन २००३ मध्ये ते कॅलिफोर्निया राज्याच्या गव्हर्नर पदी निवडून आले व अजूनही त्याच पदावर आहेत. राजकारणात ते रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.

Other Languages
azərbaycanca: Arnold Şvartsenegger
Bikol Central: Arnold Schwarzenegger
беларуская (тарашкевіца)‎: Арнольд Шварцэнэгер
客家語/Hak-kâ-ngî: Arnold Schwarzenegger
Bahasa Indonesia: Arnold Schwarzenegger
Qaraqalpaqsha: Arnold Schwarzenegger
Bahasa Melayu: Arnold Schwarzenegger
norsk nynorsk: Arnold Schwarzenegger
srpskohrvatski / српскохрватски: Arnold Schwarzenegger
Simple English: Arnold Schwarzenegger
slovenščina: Arnold Schwarzenegger
oʻzbekcha/ўзбекча: Arnold Schwarzenegger
Tiếng Việt: Arnold Schwarzenegger
Bân-lâm-gú: Arnold Schwarzenegger