आयझॅक आसिमॉव्ह
English: Isaac Asimov

आयझॅक आसिमॉव्ह

आयझॅक आसिमॉव्ह (रशियन: Айзек Азимов, Исаак Юдович Озимов ; इंग्रजी: Isaac Asimov, Isaak Yudovich Ozimov ;) (जानेवारी २, इ.स. १९२० - एप्रिल ६, इ.स. १९९२) हा इंग्लिश भाषेत विज्ञान कथा लिहिणारे अमेरिकन लेखक व बॉस्टन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

चरित्र

आसिमॉव्ह यांचा जन्म ४ ऑक्टोबर इ.स. १९१९ आणि २ जानेवारी इ.स. १९२० दरम्यान रशियातील एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मतारखेबद्दल ग्रेगरियन आणि हिब्रू कँलेंडर यातील वादामुळे निश्चित माहिती नाही. आयझॅक स्वतः त्यांचा जन्म २ जानेवारीचा मानून त्या दिवशी वाढदिवस साजरा करीत. आई-वडील नेहमी इंग्लिश आणि यिडीश भाषेत बोलत असल्याने आयझॅक यांना रशियन भाषा येत नव्हती.

आयझॅक ३ वर्षांचे असतांना आसिमॉव्ह कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. वयाच्या ५ व्या वर्षी आयझॅकने शिकण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी इंग्लिश आणि यिडीश भाषांवर प्रभुत्व मिळविले. लहान वयातच आयझॅक यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. या विषयाचे पुस्तके मिळवून ते वडिलांच्या मनाविरूद्ध वाचीत असत. वयाचा ११व्या वर्षी आयझॅकने लिखाण सुरू केले तर वयाच्या १९व्या वर्षापर्यंत त्यांचे लिखाण मासिकांमध्ये छापून येण्यास सुरुवात झाली. त्यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क पब्लिक स्कूलमध्ये झाले.. १९३९ साली त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केले. आसिमॉव्ह हे जीवरसायनशास्त्र आणि भौतिकरसायन या दोन विषयात पीएच.डी. होते तर १४ विविध विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली होती. त्याशिवाय अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सत्कार केला होता. नुकतेच (इ.स. २००९ साली) आसिमॉव्ह यांच्या सन्मानार्थ मंगळ ग्रहावरील एका विवराला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आसिमॉव्ह यांनी खगोलशास्त्र, जीवशास्त्र, गणित, अमेरिकेचा इतिहास, पुराणकथा, भयकथा, गूढकथा, लघुकथा, निबंध अशा विविध विषयांवर ५१५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या १९ पुस्तकांची सुजाता गोडबोले यांनी केलेली मराठी भाषांतरे www.arvindguptatoys.com या संकेतस्थळावर आहेत.

एप्रिल ६ इ.स. १९९२ रोजी आयझॅक आसिमॉव्ह यांचे हृदयविकाराने आणि मूत्रपिंडातील दोषामुळे निधन झाले.

Other Languages
Afrikaans: Isaac Asimov
aragonés: Isaac Asimov
العربية: إسحق عظيموف
asturianu: Isaac Asimov
Aymar aru: Isaac Asimov
azərbaycanca: Ayzek Azimov
башҡортса: Азимов Айзек
беларуская: Айзек Азімаў
беларуская (тарашкевіца)‎: Айзэк Азімаў
български: Айзък Азимов
brezhoneg: Isaac Asimov
bosanski: Isaac Asimov
català: Isaac Asimov
čeština: Isaac Asimov
Cymraeg: Isaac Asimov
Deutsch: Isaac Asimov
Ελληνικά: Ισαάκ Ασίμωφ
English: Isaac Asimov
Esperanto: Isaac Asimov
español: Isaac Asimov
euskara: Isaac Asimov
français: Isaac Asimov
Gaeilge: Isaac Asimov
galego: Isaac Asimov
hrvatski: Isaac Asimov
Kreyòl ayisyen: Isaac Asimov
magyar: Isaac Asimov
հայերեն: Այզեկ Ազիմով
interlingua: Isaac Asimov
Bahasa Indonesia: Isaac Asimov
Ilokano: Isaac Asimov
íslenska: Isaac Asimov
italiano: Isaac Asimov
қазақша: Айзек Азимов
kurdî: Isaac Asimov
Кыргызча: Айзек Азимов
Latina: Isaac Asimov
lietuvių: Isaac Asimov
latviešu: Aizeks Azimovs
Basa Banyumasan: Isaac Asimov
Malagasy: Isaac Asimov
македонски: Исак Асимов
Bahasa Melayu: Isaac Asimov
Mirandés: Isaac Asimov
Nāhuatl: Isaac Asimov
Nederlands: Isaac Asimov
norsk nynorsk: Isaac Asimov
occitan: Isaac Asimov
polski: Isaac Asimov
Piemontèis: Isaac Asimov
português: Isaac Asimov
Runa Simi: Isaac Asimov
română: Isaac Asimov
armãneashti: Isaac Asimov
русский: Азимов, Айзек
srpskohrvatski / српскохрватски: Isaac Asimov
Simple English: Isaac Asimov
slovenčina: Isaac Asimov
slovenščina: Isaac Asimov
српски / srpski: Ајзак Асимов
svenska: Isaac Asimov
ślůnski: Isaac Asimov
Tagalog: Isaac Asimov
Türkçe: Isaac Asimov
татарча/tatarça: Айзек Азимов
ئۇيغۇرچە / Uyghurche: ئىسساك ئاسىموۋ
українська: Айзек Азімов
oʻzbekcha/ўзбекча: Ayzek Azimov
vèneto: Isaac Asimov
Tiếng Việt: Isaac Asimov
Winaray: Isaac Asimov
მარგალური: აიზეკ აზიმოვი
Yorùbá: Isaac Asimov
Bân-lâm-gú: Isaac Asimov
粵語: 阿西莫夫