आँग सान सू क्यी

आँग सान सू क्यी

आँग सान सू क्यी (जन्म जून १९ १९४५, रंगून - हयात) ह्या म्यानमार ध्वज म्यानमार  देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. त्यांनी आपल्या देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे 25 वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी ९ जून २०१२ रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले.

लष्करी राजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे स्यू की यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली. ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने त्यांना तीन वेळा स्थानबध्दतेमध्ये ठेवले होते. सू क्यी ह्यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांना १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.

त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास .

जीवन

आँग सान सूकी यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात झाले होते. या महाविद्यालयास त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने भेट दिली. तेथील वातावरण आणि गतकालीन आठवणींनी त्यांना गहिवरून आले होते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो. किंबहुना भारतीय नागरिक असल्याचा भास होतो असे त्यांनी आदरपर्वूक नमूद केले. भारताशी आपले नाते हे केवळ बौध्दिक नाही तर मानसिक आहे. या मैत्रीचा गहिरा रंग त्यांनी हळुवारपणे रेखाटला. आपल्या इच्छा वा महत्वाकांक्षा या चूक नाहीत, हे श्रीराम कॉलेजने शिकविले लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांना श्रीराम महाविद्यालयाने दिली. ही त्यांची मते प्रेरक आणिा स्फूर्तीदायक वाटतात. आपल्या छोटेखानी पण प्रभावशाली अशा भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींशी चांगलीच जवळीक साधली व त्यांची मने जिंकून घेतली, हे येथे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. एखादा राजकीय नेता आपल्या संस्थात्मक स्नेह भावाच्या आधारे लोकजीवनाशी किती जवळचे संपादन करु शकतो, हे त्यांनी विचारपूर्वक आणि कृतीतूनही दाखवून दिले त्यामुळे त्यांच्या नेहरु स्मृती व्याख्यानापेक्षाही त्यांची ही लेडी श्रीराम कॉलेजची भेट महत्वाची असल्याचे दिसून येते. बदलाचे वारे दीर्घकाळ नजर कैदेत राहून राजकीय विजनवातातून बाहेर पडल्यांनतर सुकी यांनी एकानंतर एक विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी 2012 च्या पोटनिवडणुकीत दमदार विजय संपादन केला आणि आता त्यांचा प्रवास राजकीय सत्तेच्या दिशेने झेपावत आहे. त्यांचे समर्थक व अनुयायी हे प्रबळ सत्ताकांक्षेने भारावले आहेत. त्यांच्या नॅशनल डेेमोक्रेटीक लिग या पक्षाला खरोखर उज्वल भविष्यकाळ आहे. सुकी यांच्या भारत भेटीनंतर त्यांचे नैतिक बळ उंचावले आहे. आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता म्यानमारच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या दृष्टीने वाटचाल आरंभेली आहे.

सुकी यांच्या भारत भेटीनंतर लगेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्यानमारला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सुकी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमातून प्रदीर्घ अशा लोकशाही प्रस्थापनेचा लढा सफल होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी म्यानमारवर तेथील लष्करी राजवटीच्या काळात जे जाचक आर्थिक निर्बंध अमेरिकेले लादले होते ते सर्व मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे म्यानमारचा राजकीय व आर्थिक एकाकीपणा संपल्याची सुचिन्हे दिसत आहेत. उदारीकरणाच्या लाटेमध्ये आता जगातील कुठलाही देश बंदिस्त राहून आर्थिक विकास करु शकत नाही, हे कटू सत्य आहे. म्यानमारचे एकाकीपण संपावे तेथील राजकीय लोकशाही सुरळीत व्हावी तसेच सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकावीत म्हणून सुकी यांनी पुढे यावे आणि त्यांनी नजिकच्या भविष्य काळामध्ये म्यानमारला एक समर्थ आणि बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी कंबर कसावी. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मागास, गरीब आणि एकाकी पडलेल्या म्यानमारला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी सुकी यांचे नेतृत्व अधिक पक्षदर्शक आणि तेवढेच फलदायी ठरेल यात शंका नाही तोच त्यांच्या भारत भेटीचा संदेश होय.

Other Languages
Afrikaans: Aung San Suu Kyi
Alemannisch: Aung San Suu Kyi
aragonés: Aung San Suu Kyi
asturianu: Aung San Suu Kyi
башҡортса: Аун Сан Су Чжи
Bikol Central: Aung San Suu Kyi
беларуская: Аўн Сан Су Чжы
беларуская (тарашкевіца)‎: Аўн Сан Су Чжы
български: Аун Сан Су Чи
Bahasa Banjar: Aung San Suu Kyi
brezhoneg: Aung San Suu Kyi
डोटेली: आङ सान सु की
Esperanto: Aung San Suu Kyi
føroyskt: Aung San Suu Kyi
français: Aung San Suu Kyi
客家語/Hak-kâ-ngî: Aung San Suu Kyi
Bahasa Indonesia: Aung San Suu Kyi
íslenska: Aung San Suu Kyi
Basa Jawa: Aung San Suu Kyi
ქართული: აუნ სან სუ ჩი
한국어: 아웅산수찌
Lëtzebuergesch: Aung San Suu Kyi
Lingua Franca Nova: Aung San Suu Kyi
lietuvių: Aung San Suu Kyi
latviešu: Auna Sana Su Či
मैथिली: आङ सान सुकी
македонски: Аунг Сан Су Чи
Bahasa Melayu: Aung San Suu Kyi
مازِرونی: آنگ سان سوچی
नेपाली: आङ सान सुकी
Nederlands: Aung San Suu Kyi
norsk nynorsk: Aung San Suu Kyi
português: Aung San Suu Kyi
Runa Simi: Aung San Suu Kyi
संस्कृतम्: अङ्ग सान् सू की
sicilianu: Aung San Suu Ky
srpskohrvatski / српскохрватски: Aung San Suu Kyi
Simple English: Aung San Suu Kyi
slovenčina: Aun Schan Su Ťij
slovenščina: Aung San Su Či
српски / srpski: Аунг Сан Су Ћи
Kiswahili: Aung San Suu Kyi
Türkçe: Ang San Su Çi
українська: Аун Сан Су Чжі
Tiếng Việt: Aung San Suu Kyi
中文: 翁山蘇姬
Bân-lâm-gú: Aung San Suu Kyi
粵語: 昂山素姬