अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर

अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर (इंग्लिश: A Song of Ice and Fire) ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन ह्याने लिहिलेली काल्पनिक विश्वामधील एक कादंबरी शृखंला आहे. ७ कादंबऱ्या असलेल्या ह्या शृंखलेमधील पाच पुस्तके आजवर प्रकाशित झाली असून मार्टिन सहावे पुस्तक सध्या लिहित आहे. अ गेम ऑफ थ्रोन्स हे पहिले पुस्तक १९९६ साली प्रकाशित झाले तर अ डान्स विथ ड्रॅगन्स हे पाचवे पुस्तक २०११ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना सुमारे सहा वर्षाचा अवकाश लागला. ते सध्या आपल्या "द विंड्स ऑफ विंटर" या क्रमावालीतील सहाव्या पुस्तकावर काम करत आहे.o

मार्टिनने रंगवलेल्या काल्पनिक विश्वामध्ये वेस्टेरोसएसोस हे दोन खंड असून कथानक अनेक पात्रांच्या दृष्टीकोनामधून सांगितले गेले आहे. ह्या कथानकामध्ये अनेक वंशावळी व त्यांची आपापसातील भांडणे व युद्धे कल्पलेली आहेत. सुरूवातीस फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायरला वाचकांचा प्रतिसाद वाढतच गेला. ह्या शृंखलेच्या आजवर उत्तर अमेरिकेमध्ये २.४ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व त्याचे २० भाषांमध्ये अनुवादन केले गेले आहे. २०११ साली एच.बी.ओ. ह्या अमेरिकन वाहिनीवर गेम ऑफ थ्रोन्स नावची मालिका सुरू करण्यात आली ज्याला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.या मालिकेत ३ प्रमुख कथानक आहेत. विविध राज्घाराण्यामधील आपापसातील युद्धे, पदच्युत राजाची निर्वासित मुलगी डॅॅनेरीअस टारगेरीअन आणि अनैसर्गिक Others चा वाढता धोका.

पुस्तके

# शीर्षक पाने खंड प्रकाशन तारिख
1 अ गेम ऑफ थ्रोन्स 704[१] 73 ऑगस्ट 1996[१]
2 अ क्लॅश ऑफ किंग्ज 768[२] 70 फेब्रुवारी 1999[२]
3 अ स्टॉर्म ऑफ स्वोर्ड्स 992[३] 82 नोव्हेंबर 2000[३]
4 अ फीस्ट फॉर क्रोज 753[४] 46 नोव्हेंबर 2005[४]
5 अ डान्स विथ ड्रॅगन्स 1056[५] 73 जुलै 2011[५]
6 द विंड्स ऑफ विंटर (आगामी)
7 अ ड्रीम ऑफ स्प्रिंग[६] (आगामी)
Other Languages
беларуская: Песня Лёду і Агню
беларуская (тарашкевіца)‎: Сьпеў лёду і агню
français: Le Trône de fer
Bahasa Indonesia: A Song of Ice and Fire
日本語: 氷と炎の歌
Кыргызча: Муз жана от ыры
srpskohrvatski / српскохрватски: A Song of Ice and Fire
Simple English: A Song of Ice and Fire
slovenščina: Pesem ledu in ognja
српски / srpski: Песма леда и ватре
Tiếng Việt: A Song of Ice and Fire
Bân-lâm-gú: A Song of Ice and Fire